Monday, 8 May 2017

Sahil Patel

प्राथमिक शाळेतील मुलांच्या निकालाच्या दिवशी एका जि.प.शाळेला भेट दिली. तेथिल शिक्षिकेने  श्रेया या इ.४ थीतील विद्यार्थीनीची ओळख करून दिली. कविता चांगल्या करते असे सांगितले. तिच्या वहीतील एका कवितेच्या *दोन ओळी वाचून डोक्याला* मुंग्या आल्या...

पेपरात छापून आलेल्या आत्महत्या गुपचूप वाचते..

म्हणून..

रात्रभर बापाच्या अंगावर हात टाकून झोपते.